धरणगावच्या ‘शिवनेरी’वर आदिवासी महिलेच्या हस्ते झेंडावंदन
शिवसेना कार्यालयात नारीशक्तीचा असाही सन्मान
धरणगाव, प्रतिनिधी – शहरात शिवसेना कार्यालय असलेल्या ‘शिवनेरी’ वर गेली ३५ वर्षांपासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येतो. यंदा ७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवनेरी वर झेंडावंदन करण्याचा मान आदिवासी महिला द्रौपदी हिरामण भिल यांना मिळाला.
याप्रसंगी द्रोपदी भिल यांचा सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रेखाताई भागवत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. द्रौपदी भिल यांना साडी चोळी भेट देण्यात आली. माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ यांचा हस्ते पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. शरद माळी, उपजिल्हासंघटक राजेंद्र ठाकरे, जेष्ठ शिवसैनिक पांडुरंग महाजन, छोटू चौधरी, शेरू खान, किशोर आफ्रे, लखन पटोणे, फिरोज खान, रवींद्र सोनार, दिलीप महाजन, कृपाराम महाजन, सुनील चव्हाण, नगरसेवक जितेंद्र धनगर, भीमराव धनगर, राहुल रोकडे, रवींद्र जाधव, परमेश्वर महाजन, दिनेश येवले, किशोर महाजन, गोपाल महाजन, चेतन जाधव, यशवंत वऱ्हाडे, किरण मराठे, रणजित पुरभे, बापू महाजन, शरद पाटील, विनोद रोकडे, पप्पू सोनार, किरण अग्निहोत्री यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.