मराठमोळा फ्लिपकार्टचा अधिकारी संदीप पाटीलांची Truecaller च्या ‘एमडी’पदी नियुक्ती !

0

बंगळूर: कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख सांगणारे स्वदेशी अॅप ‘ट्रु-कॉलर’ने ई-कॉमर्समधील अग्रगण्य कंपनी ‘फ्लिपकार्ट’चे माजी अधिकारी संदीप पाटील यांची भारतीय व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. पाटील हे ट्रु-कॉलरच्या ग्लोबल मॅनेजमेंट टीमचा भाग असतील, ही टीम भारतात दररोज 10 दशलक्ष वापरकर्ते व्यवस्थापित करते.

संदीप पाटील हे कंपनीच्या बंगळुरू कार्यालयातून काम करतील. पाटील यांच्या अनुभवाचा फ्लिपकार्टला खूप फायदा होईल आणि यामुळे भविष्यातील योजना लवकर पूर्ण होतील असे ट्रु-कॉलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक म्हणाले. पाटील यांनी यापूर्वी, फ्लिपकार्टमध्ये अनेक महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. यामध्ये ‘फिनटेक’च्या सुरूवातीपासून त्याच्या विस्तारापर्यंतचाही समावेश आहे. फ्लिपकार्टमध्ये काम करण्याशिवाय त्यांनी लंडनमधील मॅककिन्से अ‍ॅण्ड कंपनी येथेही काम केले आहे. पाटील यांनी मुंबईच्या आयआयटी पवई येथून बी. टेकची पदवी आणि लंडन बिजनेस स्कुलमधून एमबीएचं शिक्षण घेतले आहे.