वाराणसी : वाराणसी फ्लायओव्हर दुर्घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपला पक्ष या दुर्घटनेमुळे खूप दु:खी असल्याचे सांगितले. ते दुर्घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी माध्यमाशी बोलताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले. फ्लायओव्हर बनवण्याचे काम पूर्ण करण्यासाठी तीन विनायक मंदिर तोडण्यात आले होते, अशी मला माहिती मिळाली आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, मंदिर तोडल्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे असे वक्तव्य यावेळी राज बब्बर यांनी केले.
पंतप्रधान जल्लोषात मग्न
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघातील निष्काळजीपणामुळेच एवढा मोठा अपघात घडल्याचे ही त्यांनी संगितले. एवढी मोठी दुर्घटना घडली आणि तेव्हा मोदी मात्र सेलिब्रशन करत होते… या दुर्घटनेची जेवढी जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे… तेवढीच जबाबदारी मंत्र्यांचीही आहे… यामुळे दोघांविरुद्ध कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. अधिकाऱ्यांवर तर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, कॅबिनेट मंत्र्यांनाही निलंबित करायला पाहिजे अशी मागणी राज बब्बर यांनी केली आहे.