पहिल्यांदाच स्वत: ऋषी कपूरने केला कॅन्सर असल्याचा खुलासा !

0

नवी दिल्ली: गेल्या आठ महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांनी पहिल्यांदाच स्वत: मी अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आजपर्यंत ऋषी कपूर अमेरिकेत कॅन्सर या आजारावर उपचार घेत असल्याचे बोलले जात होते. मात्र ऋषी कपूर यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यामुळे त्यांना कॅन्सर असल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नव्हते. मध्यंतरी त्यांचे मित्र निर्माते राहून रवैल यांनी ते कॅन्सर फ्री झाल्याचे सांगितले होते. तेंव्हा ऋषी कपूर यांना कॅन्सर होते असे स्पष्ट झाले होते. मात्र आता ऋषी कपूर यांनी स्वत: मी कॅन्सरवर उपचार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. माजी प्रकृती आता बरी असून मी लवकरच भारतात परतेल असेही त्यांनी सांगितले आहे.