पुणे – सासरी जाताना मुलीला माहेरची आठवण म्हणून झाड लावण्याचे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. राज्यशासनातर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमाबाबत ते बोलत होते.
कर्नाटक निर्णयावर काँग्रेसवर आक्षेप घेताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि जेडीएसला राज्य हिताचा विचार नाही. लोकशाहीत मोठ्या पक्षाला सरकार स्थापण्याचा अधिकार असतो. सुप्रिम कोर्टात या निर्णयावर दुध का दुध आणि पानी का पानी होईलच. युतीचा निर्णय आता शिवसेनेने घ्यावा. शिवसेना सोबत आली तर सोबत नाही तर एकटे लढू आणि जिंकू अशे ते यावेळी म्हणाले. खडसे निर्दोष आहेत, त्यांनी अग्निपरीक्षा दिली असेही ते म्हणाले.