शेतकरी व सामान्यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असलेल्या अशा या लबाड सरकारला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उलथवून टाका ; आमदार रोहित पवार

मुक्ताईनगर प्रतिनिधी — शेतकरी सामान्य माणूस यांच्या मतावर निवडून आलेले तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर सत्तेवर आलेलं सरकार यांना सामान्यांच्या समस्यांची काहीच देणे घेणे नाही त्या ठिकाणी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला जात आहे त्यामुळे शेतकरी व सामान्यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असलेल्या अशा या लबाड सरकारला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उलथवून टाका असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी आज मुक्ताईनगर येथे केले माजी मंत्री तथा एकनाथराव खडसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई यांचे दर्शन घेऊन कोथळी येथून दुपारी दीड वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली सदर निवडणूक मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात आले त्या ठिकाणी तीन जेसीबीच्या सहाय्याने तेथील महापुरुषांच्या पुतळ्यांवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पांचा वर्षाव करण्यात आला यावेळी मान्यवरांनी महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन केले त्यानंतर मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आमदार एकनाथराव खडसे यांचा लाडू तुला करण्यात आला त्यानंतर भव्य रॅली दुचाकी चार चाकी वाहनांच्या ताफ्यासह भव्य रॅली बोदवड रस्त्याने नंतर खडसे फार्म हाऊस वर नेण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाहनांच्या ताफ्यावर झळकत होते व भव्य अशा जीपमध्ये आमदार रोहित पवार एडवोकेट रोहिणी खडसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर भव्य मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले या ठिकाणी आमदार एकनाथराव खडसे यांचा 51 हजार रुपयांच्या नोटांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भव्य अशा पुष्प हराने नाथाभाऊंचा सत्कार करण्यात आला सोबतच ७२ किलोचा केकही कापण्यात आला.

 

याप्रसंगी आमदार रोहित पवार रोहिणी खडसे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील ,माजी मंत्री सतीश पाटील ,माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रसन्नजीत पाटील ,विकास लवांडे ,कविता मिटकरी पंकज मोहोळ ,डॉक्टर बी एस पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष भोळे, मंदाताई खडसे ,जळगावच्या महापौर जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

खरी ताकद ही ईडीची नाही तर लोकशाहीची आहे — आ. एकनाथराव खडसे

याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनीही शेतकऱ्याला उत्तर देत मला जनतेने आजपर्यंत दिलेले सर्वात मोठे प्रेम आणि आशीर्वाद आहे त्यामुळे मी आज 30 वर्षे आमदार निवडून येत आहे परंतु आज खोक्याचे राजकारण सुरू झाले आहे परंतु प्रामाणिक जनता पैशांचा नाही तर कामाचा आग्रह धरणारी आहे 2019 ला मला तिकीट मिळाले नाही त्यामुळे मुक्ताईनगरला आमदार म्हणून जो निवडून आला शरद पवार यांच्या आदेशाने निवडून आला परंतु त्यांना चाळीसगावला पाठवायचे आहे .त्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते शरद पवारांचे हात मजबूत करा हे खोक्यांचं सरकार पाडा असे आवाहन अंगार एकनाथराव खडसे यांनी केले यावेळेस प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले त्यानंतर आमदार सुनील भुसारा यांनी केले त्यासोबतच रोहिणी खडसे यांनी मनोगत व्यक्त केले त्या म्हणाले की लोकनेते पवार यांनी जी महत्त्वाचे जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती आपणा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पूर्ण करणार आहे आणि महाराष्ट्रा चे पालटवून लावू असे आश्वासन यावेळेस एड. खडसे यांनी दिले यावेळेस स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील तसेच शिंदे गटात गेलेले अजित पवार यांच्यावरही टीका करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील नेवे यांनी तसेच प्रा. डॉ. संजय साळवे यांनी केले.