अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरले नव्हते : नितीन गडकरी

0

मुंबई: आज मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी आले असून, त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचे काही ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानाने आता शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान आज दुसरीकडे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे.

शिवसेना आपल्या अडीच वर्षासाठी मुखमंत्री पद मिळावे, यासाठी ठाम आहे. नितीन गडकरी आज मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेण्यसाठी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.