मोदींच्या हिंदी प्रेमामुळे होणार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदी भाषेच्या प्रेमामुळे येणाऱ्या काळात विदेशी भाषेचे ज्ञान असलेल्यांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. सध्या पंतप्रधान कार्यालयाकडून विदेशी भाषेबाबत माहिती असलेल्यांची संख्या कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात असल्याने विदेशी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांच्या शोधात सरकार आहे. विदेशी भाषेसोबतच ज्यांना हिंदी व इंग्रजी भाषेबाबतचा ज्ञान आहे अशांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर असतांना विदेशी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हिंदीत बोलणे अधिक पसंत करतात. अर्थाचा अनर्थ होऊ नये यासाठी अनुभवी व विश्वासु लोकांची अधिक आवश्यकता आहे.