चंदीगढ: हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या रोहतकमधील घरावर सीबीआयने आज शुक्रवारी सकाळी छापेमारी केली. यावेळी हुड्डा घरातच होते. सध्या सीबीआयची कारवाई सुरू असून घरातील कोणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली-एनसीआरमधील ३० हून अधिक ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत.
२००५ मध्ये असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडला चुकीच्या पद्धतीने जमीन देण्यात आली होती. त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. सीबीआयने भूपेंद्र सिंह हुड्डा, वरिष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल वोरा आणि असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.