बेकायदेशीर कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचरला ईडीकडून समन्स !

0

नवी दिल्ली: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना आणि त्यांचे पती दिपक कोचर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. व्हिडीओकॉन कंपनीला बेकायदेशीर कर्ज वितरीत केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून चंदा कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.