नवी दिल्ली : भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला आहे. 182 मीटरच्या या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हटले जात. स्टॅच्यू ऑफ युनिटीला माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी भेट दिली. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विट करून आनंद झाल्याचे सांगितले आहे. देवेगौडा यांनी ट्विट करत पुतळ्यासोबत काढलेला फोटो पोस्ट केला. यावर मोदी यांनी तुम्हाला पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो लोकांनी हजेरी लावली आहे. यामध्ये आता देशाच्या माजी पंतप्रधानांचेही नाव जोडले गेले आहे.