नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती, वरून बराच वाद-विवाद रंगला होता. असे असतानाच आता मुखर्जी यांनी भाजपाच्या कार्यक्रमात उपस्थित दर्शवली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज रविवारी 2 सप्टेंबर गुरुग्राम येथे भाजपाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळेस त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते.
प्रणव मुखर्जी आणि मनोहर लाल खट्टर यांनी गुरुग्राममधील हरचंदपूर आणि नयागावम येथे ”स्मार्ट ग्राम परियोजना” अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान हरचंदपूर गाव दत्तक घेतले होते. यानंतर गावामध्ये कित्येक सोयीसुविधा उपलब्ध झाल्याचे म्हटले जात आहे. हरचंदपूर गावास आदर्श गाव बनवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत ग्रामसचिवालयात वाय-फायपासून ते डिजिटल स्क्रीनपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.
हरियाणामध्ये ‘प्रणव मुखर्जी फाऊंडेशन’ आरएसएसोबत मिळून काम करणार आहे अशी माहिती समोर येत आहे. मात्र, असे काहीही नसल्याचे प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.