नवी दिल्ली ।
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्सान (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पीटीआयने जारी केलेल्या व्हिडीओत पोलीस इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरून अटक करून पोलीस गाडीत नेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करताना पीटीआयने म्हटले, ज्याला त्याच्या जीवापेक्षाही तुमच्या स्वातंत्र्याची काळजी आहे. त्याच्यासाठी घराबाहेर पडा. पाकिस्तान तेहरिक ए इन्सान (पीटीआय) पक्षाच्या वकील मुसरत चीमा यांनीही इम्रान खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. पीटीआयने वकिलांचा व्हिडीओ ट्रीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात वकील मुसरत यांनी इम्रान इस्लामाबाद न्यायालयाबाहेर जखमी झाल्याचा आरोप केला आहे. वकील मुसरत यांनी इस्लामाबाद न्यायालयाबाहेरच व्हिडीओ शूट केला आणि घाबरलेल्या स्थितीत म्हणाल्या, इम्रान खान यांना मारहाण होत आहे, अत्याचार होत आहे. त्यांनी इम्रान खान यांच काय केलं हे मला माहिती नाही..