माजी लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

0

नवी दिल्ली-ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. याच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करत ट्वीटरवरून आदरांजली वाहिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.