भुसावळ प्रतिनिधी l
तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीच्या सरपंच यशोधरा
देविदास तायडे यांचे पुत्र गिरीष तायडे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास एम. आय. डी. सी. परिसरात चाकूने सहा वार केल्याने त्यास रक्ताने माखलेल्या अवस्थेत भुसावळ शहरातील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सदरील घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड तसेच कर्मचारी दाखल झाले आहेत.सदरील घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे आकाश नामक तरुणार घेऊन पाचारण झाले आहे.