कर्नाटकात सरकार स्थापनेचं सूत्रं निश्चित, सिध्दरामया मुख्यमंत्री

डिके शिवकुमार, एमबी पाटील, जारकीहोली उपमुख्यमंत्री ?

बंगळुरू l

कर्नाटकात सरकार स्थापनेचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे. कुरुबा समाजातील सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. त्यांच्या सोबत तीन उपमुख्यमंत्री असू शकतात. तिघेही वेगवेगळ्या समाजातील असतील. यामध्ये वोक्कालिगा समाजातील डीके शिवकुमार, लिंगायत समाजातील एमबी पाटील आणि नायक, वाल्मिकी समाजातील सतीश जारकीहोली यांचा समावेश आहे. कर्नाटकातील कुरुबाची लोकसंख्या

७%, लिंगायत १६%, वोक्कालिगा १४%, अनुसूचित जाती/जमाती सुमारे २७%, म्हणजे काँग्रेसला ६४% लोकसंख्या या निर्णयाने शांत करायची आहे. वास्तविक, काँग्रेस संघटनेशी संबंधित लोकांनी डीके शिवकुमार यांना त्यांच्या संघटनात्मक कौशल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बनवण्याची शिफारस केली आहे. सिद्धरामय्या हे विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री दोन्ही राहिले आहेत, असा युक्तिवाद केला जात आहे. त्यांचे वयही जास्त आहे, त्यामुळे डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी होती आहे..

सिद्धरामय्या आणि डीके दोघांनीही दिल्लीला बोलावले »» हायकमांडने सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासह या दोन्ही गटातील काही आमदारांना दिल्लीला बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हायकमांडचे संपूर्ण नियोजन आहे. सध्या कर्नाटकातील २८ लोकसभा जागांपैकी केवळ एका जागेवर काँग्रेसचे खासदार डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश आहेत. आता मोठ्या फरकाने विजय मिळाल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत २८ पैकी किमान २० जागा पक्षाच्या खात्यात याव्यात अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळेच सध्या विविध समाजाच्या व्होट बँक लक्षात घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.