जामनेरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात

। जामनेर प्रतिनिधी ।

भारतीय जनता दि. ६ एप्रिल हा ४३ वा स्थापना दिवस असून यानिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी भाजपा तर्फे ध्वजारोहण, विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. भारतीय जनता पार्टीचा वर्धापनदिनी राज्याचे ग्राविकास मंत्री ना गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ना गिरीश महाजन

यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारहणा पूर्वी देशाचे लोकप्रिय पार्टीचा प्रधानमंत्री मा नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा लाभ सर्वांनी घेतला भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त यावेळी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक कार्यासह पक्षाच्या विस्तारासाठी योगदान दिलेले जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आठवणींना उजाळा देत भाजपा नेते मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम विश्वविक्रमी आहे.


जगातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. २१ ऑक्टोबर १९५१ जनसंघ – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयालजी ते ६ एप्रिल १९८० भा.ज.पा.- श्रध्येय अटलजी, आडवाणीजी ते आज मा. मोदीजी अमितजी असा हा, अंगीकारलेल्या विचाराशी एकनिष्ठ राहून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेत जुन्या व नव्या कार्यकर्ते,

नेत्यांनी, लोक प्रतिनिधींनी केलेला दीर्घ प्रवास आहे. सत्ता हे साध्य नसून साधन आहे. अंत्योदय सर्वांचा विकास, सशक्त व संस्कारित वैचारिक भारत हे ध्येय सर्वांनी समोर ठेवले १९८४-२ खासदार, १९८९ ८६ खासदार १९९१ – ११९ खासदार १९९६-१९९८-१९९९ लोकसभेत सर्वाधिक खासदार २००४ नंतर सलग १० वर्ष केंद्रात • विरोधी पक्ष म्हणून काम केले. २०१४ मोदींच्या नेतृत्वाखाली स्वबळावर सरकार स्थापन