भाजपचे 4 आमदार माझ्या संपर्कात: कॉम्प्यूटर बाबा

0

भोपाळ: कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएसचे संयुक्त सरकार पाडण्यात भाजपला यश आले आहे. मात्र मध्य प्रदेशमध्ये उलटेच होत आहे. तेथील भाजपचे काही आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. काल भाजपच्या दोन आमदारांनी कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. दरम्यान आज कॉम्प्यूटर बाबा यांनी भाजपचे चार आमदार माझ्या संपर्कात असून योग्य वेळ येईल तेंव्हा मी त्यांना कमलनाथ सरकारच्या बाजूने करेल असे वक्तव्य केले आहे. कॉम्प्यूटर बाबांचे हे वक्तव्य भाजपसाठी धक्कादायक मानले जात आहे.