रायपूर: आज सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत चार नक्षलवाद्याना कंठस्नान घातले आहे. छत्तीसगड मधील धामतीरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठे यश मिळाले आहे.
आज सकाळी छत्तीसगढ मधील धामतीर येथे पोलीस टास्क फोर्स आणि नक्षलवादी यांच्यात चकमकीस सुरुवात झाली. सुरक्षा दलाने हा हल्ला परतावत चार नक्षलवाद्यांना ठार केले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत.