फैजपूर- शहरातील शिवाजी नगरात राहणार्या विद्यार्थ्यांचे दोन मोबाईल व 450 रु रोख रक्कम लांबवणार्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या चार ते पाच तासात गजाआड केले. शिवाजी नगरातील धीरज मधुसूदन पाटील (रा.चिनावल) हा शिक्षणानिमित्ताने भाड्याच्या घरात राहतो. 3 च्या पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञान चोरट्यांनी पाटील यांच्या घरातून 20 हजार 450 रुपये किंमतीचे मोबाईल व साडेचारशे रोख लंपास केले.
एपीआय दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, कॉन्स्टेबल योगेश महाजन व किरण चाटे यांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या चार तासात मोहित रमेश सरोदे (रा.मस्कावद, ता.रावेर) व हर्षल संजू वानखेडे (रा.विवरा, ता.रावेर) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे. या घटने प्रकरणी धिरज पाटील याने दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.