चौपदरीकरण महामार्ग अधिकाऱ्यांचे अपघाताला निमंत्रण
भुसावळ जळगाव चिखली चौपदरी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे शासन दरबारी दाखवून टोल वसुली ही सुरू झालेली आहे मात्र चौपदरीकरणावरील दोन रेल्वे ओव्हर ब्रिज चे काम अजूनही अपूर्ण असून पूर्ण झालेले नाही त्यातच जळगाव तरसोद पासून तर चिखली पर्यंत अनेक ठिकाणी चौपदरी महामार्गावर अनेक कामे बाकी असून अपघाताला निमंत्रण देणारे आहे व त्यामुळे अपघातही होत आहे चौपदरे महामार्गावर सर्विस रोड सुरू करण्यात आले आहे मात्र सर्विस रोडला लोखंडाचे साईड गार्ड लावण्यात आलेले नसून त्यामुळे मोटर सायकल स्वार नको त्या जागेवरून मुख्य रस्त्यावर आत शिरून भरधाव वाहनाच्या समोर येऊन अपघात होत आहे त्याचप्रमाणे महामार्गाच्या आजूबाजूला जेसीबीच्या साह्याने ड्रेनेस साठी चाऱ्या खोदून ठेवलेल्या असून आजपर्यंत ड्रेनेजचे काम पूर्ण झालेले नाही दिसून येत नाही त्यातच घरात भर म्हणून ज्या ठिकाणी रेल्वेओव्हर ब्रिजचे काम चालू आहे त्या ठिकाणी वाहतुकीचे विभागणी करण्यासाठी मुख्य रस्त्यावर प्लॅस्टिकचे डिव्हायडर लावून वाहतूक विभागणी केल्याचे दिसून येत आहे मात्र सदर डिवाइडर है प्लॅस्टिकचे असले कारणाने अवजड वाहनांच्या चाकांनी दोन दिवसात त्यांची हानी होऊन ते नष्ट झाले डिव्हायडर लावण्यासाठी रस्त्यामध्ये वापरण्यात आलेले लोखंडी नट बोल्ट हे प्लॅस्टिकचे डिव्हायडर तुटल्यामुळे रस्त्यावरती ऐक ते दीड इंचाने वर आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्याने सदरचे रस्त्यावर एक ते दीड इंचाने वर असलेले नट बोल्ट वरून दुचाकी व चार चाकी चे टायर गेल्याने ते फुटून मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी होईल ती होऊ नये म्हणून नाही च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रोड वरती असलेले नटबोल्ट काढून घ्यावे व होणारे अपघात टाळण्यात यावे.
जळगाव जिल्ह्यातील एम एच- १९ खाजगी चार चाकी जीप व कार यांना टोल फ्री करावे:- तरसोद ते मुक्ताईनगर हे ४५ते ५० किलोमीटरचे अंतर असून महामार्गा च्या बाजूला लागून असलेले भुसावळ ,यावल, जामनेर ,रावेर व बोदवड या तालुक्यातील नागरिक हे चौपदरीकरण महामार्गाचा वीस ते पंचवीस किलोमीटरच्या प्रवासा दरम्यान ये जा करण्यासाठी वापर करतात परिणामी हा आकारण्यात आलेला टोल हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना नाहक जादाचा टोल भरून मोठे आर्थिक नुकसान होत आहे ते होऊ म्हणून चौपदरीकरण महामार्ग प्रशासनाने जळगाव जिल्ह्यातील सर्व एम एच – १९ चार चाकी जीप व कार यांना टोलमुक्त करावे व चौपदरी महामार्गावरील अपूर्ण अवस्थेत राहिलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण करावी अन्यथा भुसावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आव्हान भुसावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तर्फे करण्यात आलेले आहे