फ्रेजरपूर – पोलीस स्टेशन अमरावती येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस भुसावळ बाजारपेठ स्टेनमध्ये अटक
भुसावळ l शहरातील पापा नगर, इराणी मोहल्ल्यातून फ्रेजरपूर – पोलीस स्टेशन अमरावती येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन अमरावती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
सदरील आरोपी भुसावळला पापा नगर, इराणी मोहल्ल्यात आल्याची माहिती बाजारपेठ चे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली असता तात्काळ गुन्हे शोध पथकाला दालनात बोलवून माहिती देऊन घटनास्थळी रवाना केले.
पथकाने आरोपी शेरु सलतनत अली (इराणी) यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केले. (ता. ६) एप्रिल रोजी फ्रेजरपूर पोलीस स्टेशन अमरावती येथील पोहेकॉ सुनील सोळंके, सागर पंडित, शेखर गायकवाड यांच्या ताब्यात दिले. सदरील कारवाई विजय नेरकर निलेश चौधरी उमाकांत पाटील प्रशांत परदेशी प्रशांत सोनार जावेद शहा जीवन कापडे अशांनी मिळून केली.