मुंबई : पेटीएमने आपल्या ग्राहकांकरिता ॲपवर मोफत क्रेडिट स्कोअर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याची घोषणा आज केली. पेटीएम वापरकर्ते त्यांच्या यूझर प्रोफाइल विभागात ‘माय क्रेडिट स्कोअर’ वर क्लिक करून आपला क्रेडिट स्कोअर केवळ मिनिटाभरात पाहू शकतील.
त्या व्यतिरिक्त वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर एक तपशीलवार क्रेडिट रिपोर्ट मिळेल, ज्यात क्रेडिट खात्याच्या वयावर आधारित कर्जाचा वापर आणि परतफेडीचा इतिहास यांची माहिती असेल. याचा उपयोग करून वापरकर्ते आपले क्रेडिट रेटिंग नक्की करू शकतात, जे बहुतांशी क्रेडिट कार्ड आणि कर्ज प्रदात्यांसाठी कर्ज मंजुरीचे एक मानक झालेले आहे.
या रिपोर्टमध्ये त्या सब्स्क्राईबरच्या नावाने असलेल्या सर्व सक्रिय क्रेडिट कार्ड आणि कर्ज खात्यांचा एक स्नॅपशॉट मिळेल, तसेच क्रेडिट स्कोअर कसा सुधारता येईल या व इतर बाबतीत काही उपयुक्त टिप्स देखील मिळतील.
क्रेडिट स्कोअरच्या आधारे, वापरकर्त्यांना तत्काळ आणि खास अशा ऑफर्स देखील मिळतात, उदा. पेटीएम पोस्टपेडची सदस्यता , ज्यात त्यांना दरमहा कोणत्याही त्रासशिवाय ३०००० रु पर्यंत कर्ज मिळू शकते.