पिंपरी चिंचवड : पत्नीला शिवी दिल्यामुळे तरुणाने मित्राची हत्या केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून राकेश मौर्यने मित्र अनिल पानसरेचा जीव घेतला. पुण्यातील तळेगाव भागात हत्येचा प्रकार घडला. आरोपी राकेश मौर्य हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. राकेश आपला मित्र अनिल पानसरेसोबत रविवारी दारु प्यायला बसला होते. दारु पिताना राकेशच्या पत्नीचा विषय निघाला. दारुच्या नशेत अनिलने राकेशच्या पत्नीला शिवीगाळ केली. हत्येनंतर राकेश पसार झाला, मात्र तळेगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत राकेशला बेड्या ठोकल्या.