नवी दिल्ली: २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दरवेळेस मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या विषयांच्या मागणीवर सुनावणी होऊ शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मंगळवारी विरोधी पक्षांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीकडे काही प्रादेशिक पक्षांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे.
निवडणूक आयोगाने युपी मधील चार याचिका याप्रकरणी फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएम यंत्र सुरक्षित असून त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे आयोगाचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पूर्ण देशातील इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट उमेदवारासमोर सिलबंद केले आहे आणि त्याचे व्हिडीओ पण काढण्यात आले आहे. त्यामुळे या बाबतीत होत असलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.
एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करत मतदानाच्या पडताळणीसाठी जोडलेल्या पावत्यांची मोजणी करण्याची याचीका केली होती. मात्र हि याचिका सुप्रीम कोर्टाने हि याचिका फेटाळून लावली आहे. राजकीय पक्षानी ईव्हीएमवर विश्वास ठेवावा, ते पूर्ण सुरक्षित आहे असे म्हटले आहे.
दुसरीकडे भाजपाने पराभवाच्या पोटी ईव्हीएमवर संशय घेतला जात आहे असा टोला विरोधी पक्षांना लावला आहे. ज्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे त्या राज्यात भाजपाला फायदा होणार असल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रशीद अल्वी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेला विजय हा भाजप प्रणीत कट आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने देऊन ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय दूर करण्याचा भाजपाचा डाव होता हे सिद्ध होईल असं त्यांनी सांगितलं होतं. तर ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.