शौचालयाच्या उभारणीसाठी रणरागिणींचा कंडारी ग्रामपंचायतीवर मोर्चा

0
भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथे सरपंचांच्या प्रभाग क्रमांक एकमध्येच महिलांसाठी शौचालय नसल्याने संतप्त रणरागिणींनी गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला. प्रभागात महिलावर्ग जात असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधार राहत असल्याने व तेथे सर्प आदी प्राण्यांचा वावर असल्याने जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रश्‍नाबाबत लक्ष घालावे, अशी अपेक्षा महिलावर्गाने व्यक्त केली.
गुरुवारी दुपारी प्रभाग एकमधील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरुन मोर्चा निघून तो ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला.निवेदनावर विक्की मेश्राम, प्रमोद पगारे, चेतन तायडे, कविता तायडे, शारदा देवरे, शोभा शिंदे, रविना किरकुळे, कांताबाई निकम, जया गरुड, अश्‍विनी भिडे, सुनिता सोनवणे, लिना रगडे, रेखा रगडे, रेखा रगडे, वंदना निकम, उमा जाधव, चंद्रकला जाधव, सीमा देवरे, अंजना देवरे, शोभाबाई पगारे, अलका पगारे, नलिनी सोनवणे, आशा यशोदे, मनोज पगारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.