आज पुन्हा पेट्रोल-डीझेल स्वस्त !

0

मुंबई-पेट्रोल-डीझेलच्या दराने सामान्यांना त्रस्त करून सोडले होते. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य बेजार होत असतांना मागील १३ दिवसांपासून सतत पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही दरांमध्ये घट होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डीझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोल २० पैसे प्रति लिटर तर डिझेल ८ पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे.

मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर ८५ रुपये ४ पैसे इतका असेल तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये ३२ पैसे इतका असेल. दिल्लीतही पेट्रोल प्रति लिटर २० पैसे आणि डिझेल प्रति लिटर सात पैसे स्वस्त झालं आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७९ रुपये ५५ पैसे इतका असेल तर तर डिझेलचा दर प्रति लिटर ७३ रुपये ७८ पैसे इतका असेल. पेट्रोलच्या दरांनी नव्वदी गाठली होती, तर डिझेलचे दर ८० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले होते.