सामान्यांना अंशतः दिलासा; आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल स्वस्त

0

मुंबई- आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल २४ पैसे तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत आज प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८७.८४ पैसे तर प्रतिलिटर डिझेलचा दर ७९.१३ पैसे आहे.

काल दसऱ्याच्या मुहूर्ताला मुंबईमध्ये प्रति लिटर पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर ११ पैशांनी कपात झाली होती. दिल्लीमध्ये आज प्रतिलिटर ८२.३८ पैसे तर डिझेलचा दर ७५.४८ पैसे आहे. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.