पेट्रोल करणार नव्वदी पार?

0

नवी दिल्ली- देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान २ दिवसांपासून पुन्हा इंधन दरात वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात ९० रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचू शकता अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने इंधन दरात वाढ होत आहे. सध्या मुंबईत पेट्रोलचे दर ८५.२० प्रति लिटर तर दिल्लीत ७७.७८ रुपयावर पोहोचले आहे.