जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या कपाशी या पिकाला भाववाढीसाठी कापसाची अंत्ययात्रा 

जामनेर प्रतिनीधी l

आज नगरपालिका समोरील राजमाता जिजाऊ चौक ते तहसील कार्यालय या ठिकाणी जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या कपाशी या पिकाला भाव मिळावा यासाठी युवासेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण युवा सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या खान्देश चे लाडके पिक पांढरे सोनं कापूस गेल्या सात महिन्यापासून भाव वाढ मिळेल याची वाट पाहत त्याने जागेवर दम सोडला आहे…. जगाचा पोशिंदा शेतकरी माय बापाने पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याची सेवा केली त्याला लहानचे मोठे केले. किंबहुना मागील चार महिन्यापासून कापसाला रोगराईने घेरले होते संपूर्ण अंग खाजवत होते अशा मध्ये त्याला उज्वल भविष्य येईल माझा कापूस जगाची माय लेकीची अब्रू झाकणारा म्हणून अपेक्षेने त्याला गोजरले परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणास तो बडी पडला त्याचा करून अंत झाला. त्यास जबाबदार महाराष्ट्र आणि भारत शासन आहे बहुसंख्य कापूस उत्पादक शेकऱ्यांसाठी रीती रिवाजा प्रमाणे कापसाची अंतयात्रा काढण्यात आली खान्देश मधील जामनेर तालुक्यातील शेतकरी चे कापूस पांढरे सोन हे मुख्य पीक असून ते जवळ पास मागील सहा महिने पासून बाजार भाव नसल्याने मालास उठाव नसल्याने घरातच पडून आहेत. आपल्या भागातील जवळ पास सर्वच शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्था ला खिळ बसली आहे आणि आता नवीन हंगाम सुरू झाला आहे. त्यात शाळा सुरू होणार आहेत, तसेच पावसाळ्यात साथीची आजार पसरून दवाखाने खर्च वाढत असतो, त्या मुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रास सहान करीत असून ती तणाव खाली आला असून निराशा चा गर्तेत सापडला आहे म्हणून अंत्ययात्रा मार्च शेतकऱ्यांच्या कापसाला वाढीव रुपये 16000 प्रती क्विंटल मिळावा. त्याबद्दल आस्था दाखवत सरकार चे लक्ष वेधण्यासाठी आणि पुढीलप्रमाणे त्यासाठी आमच्या 5 प्रमुख मागण्या आहेत.

1) शेती ला मशागती साठी लागणारे ट्रॅक्टर नागरटी, बैलजोडी मशागत ,पंप,अवजारे, ठिबक संच,पाईप,मजुरी,बियाणे, खते,औषध फवारे,शेत माल काढणी चा खर्च, मजुरी, आणि शेतकरी घरी उदरनिर्वाह करता लागणार खर्च मागील दहा वर्षात जवळ पास चौपाट ने वाढला आहे. त्या तुलनेत दहा वर्षा आधी 4000 रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी होत होता. तर येत्या पुढील हंगामात किमान 16,000 रुपये प्रति क्विंटल दराने सरकार ने राज्यातील “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या” मार्फत कापूस खरेदी करण्याची लेखी हमी द्यावी.

2) जर केंद्र आणि राज्य सरकार ला कापूस पिकास प्रती क्विंटल 16,000 रुपये भाव देणे शक्य नसल्यास मदत म्हणून महगाई भत्ता सारखे प्रती एकर 5,000 रुपये अनुदान पेरणी करताना 15 जुन चा आत शेतकरी ना द्यावे जेणे करून त्याचे वरील भार कमी होईल

3) जर केंद्र आणि राज्य सरकार हमी भाव पण देऊ शकत नसेल आणि पेरणी पूर्व अनुदान पण देत नसेल तर राज्यातील शेतकरी ना ठिबक, अवजारे, उत्तम बियाणे, रासायनिक खते, फवारे, हे 90% सरकारी अनुदान वर शेती चा बांधावरच उपलब्ध करून देऊन शेत मजूर हे केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजना नुसार शेतकरी ना मजूर उपलब्ध करून द्या..

4) तालुक्यातील संपूर्ण शेतकरी बांधव आणि त्यांचा शेती चा विमा स्वतः सरकारे ने काढावा संपूर्ण पैसे है सरकार ने भरले पाहिजे आणि त्यानं सुरक्षा कवच दिले पाहिजे.

5) जामनेर तालुक्यातील ज्या गावाची लोकसंख्या दहा हजार वर आहे. अश्या प्रत्येक गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित गोदमे आणि बाजार समिती वर हमी भाव ने शेती माल खरेदी विक्री सरकारी यंत्रणा उभी करावी ,सुरू करावी जेणे करून भोळा – भाबडा शेतकऱ्यांची लूट होणार नाही कुणी त्याला अडून पाहणार नाही.

वरील फक्त 5 मागण्या असून जर हे राज्य सरकार ला शक्य नसल्यास त्यांनी जाहीर करावे. आम्हाला हे जमत नाही, शक्य नाही, आम्ही आपले या महाराष्ट्र राज्यातील 7 करोड पेक्षा जास्त शेतकरी ना न्याय देऊ शकत नाही . या विषयी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची भाववाढ भूमिका घेतली नाही. “13 व्या दिवशी पहुर येथे” या सरकार चे तेरावे घातल्या विना आम्ही स्वस्त बसणार नाही.या आशयाचे निवेदन वजा इशारा तहसीलदार नानासाहेब आगळे याना राहुल दत्तात्रय चव्हाण युवासेना उपजिल्हाप्रमुख यांनी दिला आहे या वेळी युवा सेना,शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते