जळगाव जि.प. आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत बायोमेडीकल वेस्ट अॅन्ड सर्जीकल या साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी गेल्या आर्थिक वर्षात केली गेली. ही खरेदी जवळपास दीड ते दोन कोटी पर्वत आहे. सदर खरेदी ही दिव्यांश एजन्सी या फर्मच्या नावाने करण्यात आलेली असून त्यांची बिले सुद्धा अदायगी करण्यात आलेली आहे. ही फर्म राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी यांच्या नातेवाईकांच्या नावाने असल्याची बाब देखील जि.प आरोग्य विभागातून समोर येत आहे. विषेश म्हणजे जिल्ह्यातील बहुश खरेदी याच एजन्सीकडून करून घेण्यात आली आहे.
जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये
दरवर्षी मोठ्या प्रमाणात बायोमेडीकल वेस्ट व सर्जीकलच्या विविध साहित्याची खरेदी शासनाकडून आलेल्या निधीतून केली जात असते. यासाठी आरोग्य केंद्रांना निधी मंजुर करण्यात येत असतो. या साहित्याची खरेदी आपल्याच नातेवाईकाच्या एजन्सीकडून कावी यासाठी पन्दतीशिरपणे तजवीज केली याच दिव्यांश एजन्सीशी संबधीत नातेवाईक कार्यरत असल्याने अधिकान्यांकडून देखील या एजन्सीला झुकते माप देण्यात आले असल्याचे खरेदी प्रक्रीयेवरून दिसते.
शासन निर्णय १ डिसेंबर २०१६ च्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यालयीन खरेदी करत असताना त्या कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचा व त्यांच्याशी संबंधीत असणाऱ्या व्यक्तीचा कार्यालयाशी कोणताही हितसंबंध नसल्याबाबत स्पष्ट सूचना असून देखील संबंधित कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची दिशाभूल करून स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या फर्म मधून सदर खरेदी केली आहे. व वारंवार याच फर्म कडून इतर साहित्य देखील खरेदी करण्यात येत आहेत. सदर खरेदी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मार्गदर्शक व शासन निर्णयानुसार नियमबाह्य असून यामध्ये खूप राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शासन आदेशाची पायमल्ली संबंधित कर्मचारी यांनी तीन कोटेशन देऊन कोटेशनद्वारे खरेदी प्रकिया पूर्ण करून खरेदी करण्यात आलेली आहे. विषेश म्हणजे हाच कर्मचारी तीन कोटेशन गोळा करून देतो आणि नातेवाईकाच्या एजन्सीकडून खरेदी करतो. संबधीत एजन्सी नातेवाईकाच्या नावे असली तरी चालक मालक आरोग्य कर्मचारीच असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात कुंपनच शेत खायला निघाले असल्याचे यातून दिसुन येते.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एन. एचएम यांनी देखील सन २०२२ २०२३ मध्ये याच फर्म कडून इतर साहित्य खरेदी केल्याबाबत माहिती मिळालेली आहे.
लेखा परिक्षणात आक्षेप
सन २०२१-२२ मध्ये राज्य सोसायटी मुंबई यांच्याकडून नियुक्त केलेल्या लेखापरीक्षक यांच्याकडून या विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. या लेखा परिक्षणाच्या अहवाल मध्ये याबाबतीत सदर फर्मचे ऑडिट परे काढलेले असून अद्याप पावेतो जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी सदर फर्ममधून झालेल्या खरेदीबाबत कोणताही चौकशी व कठोर निर्णय घेतलेला नाही व त्यामध्ये सामील असणान्या संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.