जि.प. सदस्य प्रताप पाटील यांच्या नेतृत्वात “युवा सेना आपल्या दारी” कार्यक्रमाची नांदेड येथून सुरूवात
जळगाव | प्रतिनिधी
युवा सेनेच्या “युवा सेना आपल्या दारी” या कार्यक्रमाला नांदेड (ता.धरणगाव) येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना उपजिल्हाध्यक्ष भैया महाजन, मराठे सर, युवासेना तालुकाध्यक्ष दिपक भदाने, उप तालुकाध्यक्ष उगलाल पाटील, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष, शाहरुख पटेल, संघटक शेतकरी तालुका उपाध्यक्ष रावसाहेब पाटील साळवा, साखरे संघटक, किशोर पाटील तसेच दानिश भाऊ पठाण, आबा माळी, सतीश पाटील भवरखेडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना युवा सैनिक, शाखाध्यक्ष व युवा सेना तालुका उपप्रमुख भरत सैंदाणे यांनी केले. सदर कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा नेते प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना चांगले काम करत असून जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम व कार्यक्रम युवा सेना मार्फत भविष्यात राबविण्यात येतील, असे तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष दिपक भदाणे, भरत सैदांणे यांनी सांगितले.