कोहलीच्या वेगावरून मुंबई पोलिसांची सोशल मिडीयावर भन्नाट पोस्ट

0

मुंबई : काल भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. भारताने ३२१ धावांचे आव्हान वेस्ट इंडीज संघाला दिले होते. शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचलेला हा सामना अखेर बरोबरीने सुटला. त्यामुळे विजय कोणत्याही संघाला मिळविता आले नाही. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रम केले. कोहलीनेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद दहा हजार धावांची नोंद केली. त्याने सर्वात जलद हा पल्ला गाठला आहे. त्याच्या या वेगावर मुंबई पोलिसांनी एक गंमतदार पोस्ट केली.

मुंबई पोलिसांनी लिहिले की,” विराट कोहलीच्या या वेगासाठी आम्ही कोणतेही चलान फाडणार नाही. तु असाच खेळत रहा आणि आमच्याकडून तुला शुभेच्छा.”

२१२ व्या वन डेतील २०५ व्या डावात त्याने ही कामगिरी करीत सर्वांत कमी खेळींमध्ये अशी किमया साधण्याचा मान पटकविला. याआधीचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. त्याने २५९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. सौरव गांगुली (२६३ डाव), रिकी पाँटिंग (२६६), जॅक कालिस (२७२), महेंद्रसिंग धोनी (२७३) व ब्रायन लारा (२७८) यांनी दहा हजार धावांचा विक्रम केला आहे.