रेल्वेच्या टॉयलेटमध्ये आता पाणी आणि कोल्ड ड्रिंक बॉटल

0

नवी दिल्ली । भारतीयरेल्वेच्या कंत्राटदारांचा गचाळ आणि घाणेरडापणा अजूनही जायला तयार नाही. रेल्वेत चहासाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर आता रेल्वेच्या शौचालयात पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेय ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रेल्वेने संबंधित कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गरीब रथ एक्स्प्रेसच्या एका शौचालयामध्ये पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेयांची साठवणूक करत आहेत.

रेल्वेकडून गंभीर दखल
तसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेकडून कंत्राट रद्द करण्यासाठी आयआरसीटीसीद्वारे कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.