दिवाळीत सामान्यांना झटका; सिलिंडरच्या दरात वाढ

0

नवी दिल्ली-मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीत कपात करण्यात येत आहे. अंशत: का होईना पण कपात होत आहे. जनतेला यातून थोडाफार दिलासा मिळतो आहे. या महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही ५९ रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर अनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात २.९४ पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे. ऐन दिवाळीच्या काळात सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांना मोठा झटका आहे.

नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ८८० रुपये असेल. विशेष म्हणजे अनुदानित सिलिंडरवर देण्यात येणारी सूट सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांच्या खात्यात ४३३.६६ रुपये जमा होतील. तर ऑक्टोबर २०१८ मध्ये ही रक्कम ३७६.८० पैसे इतकी होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्यामुळे आणि विदेशी मुद्रा विनिमय दरातील चढ-उतार हे सिलिंडरच्या दर वाढीस कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.