गौतम गंभीर बनला अनेकांचे आधार

0

नवी दिल्ली- सध्या आयपीएलच्या ११ व्या मोसमातील दिल्ली डेरीडेव्हल्स संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार करण्यात आलेल्या गौतम गंभीरची वास्तविक आयुष्यात सामाजिक क्षेत्रात खूप मोठी कामगिरी आहे. ज्यांना काही आधार नाही अशा लोकांना गंभीर नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतो. गंभीरने छत्तीसगडमधील सुकमा आणि काश्मीरमध्ये शहीद झालेल्या काही जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. शिवाय जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अब्दुल रशीद यांच्या मुलीचे अश्रू पाहून हेलावल्या गंभीरने तिच्याही शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे.

वेळात वेळ काढून, सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर गंभीरने शहीदांच्या मुलांना आयपीएलचे सामने पाहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. गंभीरने छत्तीसगडमधील सुकमा आणि काश्मीरमध्ये शहीद झालेल्या काही जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गंभीरने शहीद जवानांच्या मुलांशी गप्पा मारल्या. इतकंच नाही तर त्याने आयपीएलचा सामना पाहण्यासाठी निमंत्रण दिले. सध्या गंभीरची संस्था 12 कुटुंबातील 18 मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत आहे.

नक्षलवाद्यांनी सुकमात केलेल्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते, त्यानंतर गंभीरने संस्था सुरु करुन, शहिदांच्या मुलांना मदतीचा हात दिला. दरम्यान, आयपीएलच्या 11 व्या मोसमात सातत्याने पराभवाला सामोरं जावं लागत असल्याने, गौतम गंभीर दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. मुंबईकर श्रेयस अय्यर दिल्लीची धुरा सांभाळत आहे.