गौतम गंभीर भाजपात?

0

नवी दिल्ली-सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असलेला भारताचा फलंदाज गौतम गंभीर भारतीय जनता पक्षात जाणार आल्याचे बोलले जात आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी भाजप गौतम गंभीरला तिकीट देण्यासाठी इच्छुक असल्याचेही सांगितले जात आहे.

दिल्लीत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपला एका चांगल्या चेहऱ्याची गरज होती. गेल्या काही महिन्यांच्या काळात दिल्ली भाजपमध्ये कमालीची मरगळ पसरली होती. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक क्षेत्रात गौतम गंभीर करत असलेल्या कामाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

२०१६ साली कसोटी सामन्यात गौतम गंभीरने शेवटचे भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. २०१२ नंतर गौतम गंभीर भारताकडून एकही मर्यादीत षटकांचा सामना खेळलेला नाही. भाजप प्रवेशाच्या बातमीवर गौतम गंभीरने अधिकृत घोषणा केलेली नाही.