गौतम गंभीर दिल्लीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; पहा इतकी आहे संपत्ती !

0

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने राजकारणाची नवी इनिंग सुरु केली आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर गंभीरला पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. काल गंभीरने उमेदवारी अर्ज दाखल केला. यात गौतम गंभीर दिल्लीतून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारापैकी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असल्याचे दिसून आहे. उमेदवारी अर्ज भरताना गंभीरने आपली संपत्ती जाहीर केली आणि त्यात तो 147 कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे समोर आले आहे. 2017-18च्या प्राप्ती कर परतावात गंभीरने त्याचे उत्पन्न 12.40 कोटी असल्याचे जाहीर केले आहे, तर त्याची पत्नी नताशाच्या प्राप्ती कर परतावात 6.15 लाखाचे उत्पन्न दाखवले आहे. पश्चिम दिल्ली मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेले महाबल मिश्रा हे दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 45 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 12 कोटींची वाढ झाली आहे.