गौतमीने नृत्य करताना अश्लील हाव भाव करू नये : या संघटनेने दिला सल्ला अन्यथा…

खानदेश मधील गौतमी पाटील ने आपल्या नृत्याच्या अदाने सर्वांना घायल केलेले आहे. तिच्या कार्यक्रमाला लाखो, हजारो लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते.

अनेकदा शांतता सूर्यास्तादेखील बिघडून जाते आणि पोलिसांना गर्दीवर नियंत्रण देखील ठेवावी लागली आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता गौतमी व मराठा संघटना हे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत आणि अनेक संघटना तिच्या अवतीभवती फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील आणि मराठा संघटना यांचा वाद सुरू आहे. हा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता देखील अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे मराठा संघटना आणि गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या भवऱ्यात सापडले आहेत.

गौतमी पाटील च्या पाटील या आडनावाला आमचा विरोध नाही परंतु गौतमीने नृत्य करत असताना कोणत्याही प्रकारचे अश्लील हावभाव व चाळे करू नये असा सल्ला मराठा महासंघाच्या नेता नेत्या अनुराधा ठाकरे यांनी दिलेला आहे.

गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील तिच्या पाटील आडनावावरून वादामध्ये आली होती परंतु ती आपले नाव बदलणार नाही यावर ठाम आहे अशावेळी महासंघाने हा निर्णय घेतला.

अनुराधा ठाकरे या जालन्यामध्ये पत्रकारांशी संबंधित असताना त्या म्हणाले की, पाटील ही एक पदवी आहे. आज ही अनेकांना गावांमध्ये पाटील या नावाने ओळखले जाते. मानसन्मान केला जातो अशावेळी गौतमीने देखील आपल्या पाटील आडनावाची इज्जत ठेवायला हवी.

तिचे आडनाव जरी पाटील असले तरी पाटील हे नाव सन्मानाचे प्रतीक मानले जाते. पाटील या आडनावावर कुणाचा हक्क नाही परंतु गौतमीने नृत्य करत असताना अश्लील हावभाव करू नये, जेणेकरून युवा तरुण पिढीवर कोणत्याही प्रकारचे वाईट संस्कार व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी देखील घ्यावी असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

संभाजी राजे छत्रपती यांनी देखील या वादामध्ये आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की पाटील हा एक सन्मान आहे. एक किताब आहे. महिलांनी आपले गुण व कर्तृत्व दाखवायला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी महिलांना पाठिंबा देखील द्यायला हवा असे देखील संभाजी राजे छत्रपती म्हटले.