फ्रीचार्जचे फाउंडर कुणाल शाह पुन्हा एक नवीन स्टार्टअप घेऊन आले आहेत. यात तुमच्या क्रेडिट कार्डच पेमेंट केल्यावर तुम्हाला कॅशबॅकसह अनेक आकर्षक रिवॉर्डस मिळणार आहेत.
कुणाल शाह यांनी ‘Cred’ हे एक नवीन ॲप सुरु केले आहे. या ॲपमधून केवळ क्रेडीट कार्डचेच पेमेंट करता येते. जितक्या रुपयांचे पेमेंट असेल तितके Cred कॉईन तुम्हाला मिळतील. हे Cred कॉईन वापरून तुम्हाला रिवार्डस मिळवता येईल. सध्या ठराविक क्रेडिट स्कोर असणाऱ्या ग्राहकांनाच याचा लाभ मिळणार आहे.
अनेकदा पेमेंटची तारीख लक्षात नसल्याने विनाकारण दंड भरावा लागतो. यावर पर्याय म्हणून तुमच्या व्हाटसॲपवर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड विषयीचे अपडेट मिळणार आहेत. क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यासाठी हे ॲप पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा डेव्हलपरकडून करण्यात आला आहे.