पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राला (पीसीसीओईआर) नवी दिल्ली मधील प्राईम टाईम ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड संस्थेच्या वतीने ‘मोस्ट रिझल्ट ओरिएंटेड इंजिनिअरिंग कॉलेज इन पुणे’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशचे युवक आणि कल्याण मंत्री चेतन चव्हाण आणि खासदार अमर सिंह यांच्या हस्ते पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचा निकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. यावर्षी महाविद्यालयाला इंडीया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा एकाच वेळी 149 कॉपीराईटसची नोंद केल्याबद्दल पुरस्कार मिळाला. महाविद्यालयाचे 84 पेटंट झाल्याची नोंद, 60 टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार तसेच यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांना ‘बाजा’ सारख्या राष्ट्रीय स्पर्धेत मिळालेला पाचवा क्रमांक आदी घडामोडी अवघ्या चार वर्षाच्या अल्प काळात केल्याबद्दल हा विशेष सन्मान महाविद्यालयाला मिळाला असे प्राईम टाईम ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवार्डने जाहीर केले.
यांनी केले अभिनंदन
पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एस.फुलंबरकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्गाचे या यशाबद्दल अभिनंदन केले.