रावेर- तालुक्यातील तांदलवाडी येथे चोरट्यांनी 28 हजारांची घरफोडी केल्याने गावात घबराट पसरली आहे. इंदुबाई श्रावण नमायते (50, तांदलवाडी) या 3 रोजी रात्री गल्लीतील महिलांसोबत घराबाहेर बसल्या असताना चोरट्यांनी मागचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत 18 हजार रुपये किंमतीची नऊ ग्रॅमची चैन तसेच आठ हजार रुपये किंमतीच्या चार ग्रॅमच्या बाह्या तसेच दोन हजार 300 रुपयांचे चांदीच्या पाटल्या मिळून 28 हजार 300 रुपयांचा ऐवज लांबवला. 3 रोजी 12.30 ते 3 दरम्यान ही चोरी झाली. निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल असून तपास हवालदार राजू रामदास कुमावत करीत आहेत.