मोदी सरकारच्या ९ वर्ष पुर्तीबद्दल “महाजनसंपर्क अभियान” अंतर्गत “घर चलो अभियान”
खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर यांनी घेतली भाजपा मुक्ताईनगर पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक...
मुक्ताईनगर प्रतिनिधी !
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाले असून, या निमत्ताने देशभरात भाजपा मार्फत मोदी@9 “महाजनसंपर्क अभियान” सुरू आहे,
रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यात “घर चलो अभियान” राबविण्यात येणार असून, सदर कार्यक्रमाच्या नियोजन साठी काकोडा (मुक्ताईनगर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुक्ताईनगर तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात आली.
यावेळी “घर चलो अभियान” अंतर्गत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन मोदी सरकार मार्फत जन सामान्यपासून तर विविध क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा जोखा मांडण्यात येणार असून, मागील ९ वर्षात देशात झालेल्या विकास कामांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर यांनी दिली.
यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर* यांच्यासह विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री.ललित महाजन, तालुकाध्यक्ष श्री.प्रफुल जवरे, श्री.रसाल पवार, तालुका सरचिटणीस श्री.चंद्रकांत भोलाणे, श्री.विनोद पाटील, श्री.राहुल राणे, मुक्ताईनगर शहराध्यक्ष श्री.पंकज सोनावणे, अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.संतोष झनके, माजी पं.स.सदस्य श्री.राजेंद्र सवळे, स्वप्निल न्हावकर, गोपाळ कांडेलकर, भरत मदने, विशाल झाल्टे, मोरेश्वर महाराज, विठ्ठल कांडेलकर, नांदू खिरळकर, वाल्मिक हटकर, विकास तौअडे, योगेश कांडेलकर, सोपान झाल्टे, रामचंद्र झाल्टे, सुनिल पाटील, विनोद चौधरी, ज्ञानेश्वर ढोले, विलास जळमकार, निखिल भोलाणकर, अमोल खिरळकर, अमोल जैस्वाल, नरेश भोलाणकर ई. उपस्थित होते.