लोकसभा अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट !

0

नवी दिल्ली: लोकसभेच्या अंदाज समितीच्या (२०१-20-२०२०) अध्यक्षपदी माजी मंत्री पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत २९ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीश बापट महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून भाजपतर्फे निवडून गेले आहे.