मुंबई-राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सांताक्रुझमधील भुजबळांच्या निवासस्थानी जाऊन महाजनांनी छगन भुजबळांशी चर्चा केली. गिरीष महाजन यांनी छगन भुजबळांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी महाजन भुजबळांच्या भेटीला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भुजबळ यांच्यावर नुकतीच शश्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी ते गेले असावे.
मागील आठवड्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयासाठी मदत केल्याचे बोलले जात आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी ते धक्का मानले जात असल्याने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.