गिरीश महाजनांचे यश कार्यकर्ते नव्हे, पैसे व ‘ईव्हीएम’च्या जोरावर

0

अनिल भाईदास पाटील यांचा आरोप

चाळीसगाव – मी माझ्या राजकीय जीवनातील पंचवीस वर्षे भाजपामध्ये घातली आहे. पक्षातील काही रतन खत्रिंमुळे मी पक्ष सोडला हे सर्वश्रुत आहे. माझ्या पत्नी जयश्री पाटीलांनी नगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाची निवडणूक लढविली. आता माझी उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हायची आहे. तोपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत घेऊन जनसंपर्क सुरू ठेवला आहे. येणारी निवडणूक ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रस व समविचारी पक्षाच्या माध्यमातून लढविली जाईल. केंद्र व राज्य सरकारवर जनतेची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आमचा विजय पक्का आहे. गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ जागा जिंकण्याचे दिव्यास्वप्न पाहत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्ते यांचे भाजप मध्ये काय हाल आहेत. हे त्यांनाच विचारा. असे असताना गिरीश महाजन जेथे जातात तेथे सांगितलेल्या जागा निवडून आणतात हे गणित त्यांचे कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर नसून पैश्याच्या व ईव्हीएम मशीनच्या जोरावर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. ते आज चाळीसगाव विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कांग्रेसचे माजी आमदार ईश्वर जाधव ,जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंखे , माजी उपनगराध्यक्ष शाम देशमुख, माजी जी प. सदस्य मंगेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वर ठाकरे, रतन साळुंखे, बंडूनाना अहिरराव, भैय्यासाहेब पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील,पंजाबराव देशमुख, शुभम पाटील, दीपक शिंदे, गोकुळ पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.