चोपडा प्रतिनिधी
येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा – २०२३ चा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. यात विद्यालयाचा एकूण निकाल ९१.४० टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक कु. प्रणाली किरण पाटील या विद्यार्थिनीने ९३.८० टक्के गुण मिळवत पटकावला. तर द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी प्रल्हाद माळी (९०.४० टक्के) व तृतीय क्रमांक कु. मोहिनी एकनाथ पाटील (८९.४० टक्के) या विद्यार्थिनींनी पटकावला. विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून यंदाही निकालामध्ये विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. एकूण २७ विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. सेमी इंग्लिश विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी, यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.