बीड-राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीची माहिती गुप्त का ठेवण्यात आली आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सरकार जर या प्रकरणी स्पष्टीकरण देणारच नसेल तर आरोप होणारच त्यामुळेच राफेल विमान खरेदीची माहिती संसदेत देण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा बीडमध्ये झाला यावेळी पवार बोलत होते.
शरद पवार यांनी राफेल करारावरून मोदींना क्लीन चिट दिल्याचे आरोप होत होते. त्यावरूनच खासदार तारिक अन्वर यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे पवार यांच्या व्यक्तव्यावर लक्ष लागून होते.