पुणे :- महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठी स्वेच्छेने मोफत प्रशिक्षण देऊ शकतो, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी काल सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्युशन लावण्याची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांच्याकडे ट्युशन लावण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रति सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. https://t.co/lm7hj4t2ue
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 25, 2018
अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये “कधी कधी आरएसएस शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठी स्वेच्छेने मोफत प्रशिक्षण देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रती सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत ’’ असा टोला लगावला आहे.