भुसावळ ह शहरात पाण्यासाठी हा:हाकार माजलेला आहे. शहरी व ग्रामीण भागात पाण्याअभावी हाल होत आहे. पाणीटंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असून, उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याकरीता भटकंटी करावी लागत आहे. भुसावळकरांना पाणी द्या अन्यथा १५ ते २० दिवसांत पाणी न मिळाल्यास आ. संजय सावकारे यांच्या घरावर जलक्रांती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संविधान आर्मीचे जगन सोनवणे यांनी सांगितले. येथील शासकीय विश्रामगृह आवारात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
यावेळी संविधान परिषदेचे राकेश बग्गन, आरीफ शेख, तालुकाध्यक्ष संघपाल कीर्तीकर, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष शशी तायडे, युवाध्यक्ष गौरव वाघमारे, मोनू वाघमारे, युवाजिल्हाध्यक्ष सचिन बार्हे, यावल तालुकाध्यक्ष योगेश साळुंखे, उपाध्यक्ष मनोज तायडे, युवा तालुकाध्यक्ष सागर सपकाळे, आषुतोश बोदडे, नितेश खुरपडे, लकी बेंडवाल यांच्यासह विविध १० संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संविधान आर्मीचे जगन सोनवणे यांनी सांगितले की, पाण्याकरीता आजही महिलांचे हाल थांबलेले नाही. महिलांना पाण्याकरीता शहरात भटकंती करावी लागत आहे. आ. संजय सावकारे पालकमंत्री होते. त्यानंतर दोन -तीन वेळा आमदार झाले. नागरिकांना पाणी देण्याकरीता आमदार नापास झाले आहे. १५ ते २० दिवसांची संविधान आर्मीतर्फे मुदत देण्यात आली असून, पाण्याचे रोटेशन विस्कळीत झाले. शहरात टँकरने नागरिकांना पाणी पोहचत नाही. याला आमदार जबाबदार आहे. म्हणून आ. संजय सावकारे यांच्या घरावर जलक्रांती मोर्चा संविधान आर्मी तसेच विविध १० संघटनेतर्फे काढण्यात येणार आहे. ईव्हीएम हटवा अशी मोहिम संविधान आर्मीतर्फे राबविण्यात येत आहे. ईव्हीएममुळे सावकारे हे आमदार झाले. त्यांच्या मागे माजी आ. संतोष चौधरी होते म्हणून ते आमदार झाले. त्यानंतर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे होते म्हणून पुन्हा आमदार झाले. आता फक्त आ. सावकारे यांच्या पाङ्गीशी ईव्हीएम मशीन आहे. मात्र जनाधार नाही, अशी परिस्थिती त्यांची आहे. ईव्हीएम हटविण्यात यावे, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी संविधान आर्मीतर्फे करण्यात आली आहे. ½वडगाव दिघे येथील प्रलंबित मागण्यासंदर्भात मलकापूर येथे २० एप्रिल रोजी संविधान आर्मीतर्फे रेलरोको आंदोलन १२.३० वाजता करण्यात येणार आहे. तसेच अमरावतीचे खा. नवनीत राणा व बडनेरा येथील आ. रवी राणा यांनी दलितांना छळण्याचा प्रयत्न केला. तेथील दलीत चळवळीचे कार्यकर्ते राजेश वानखेडे यांच्यावर प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले आहे. सत्तेचा दुरुपयोग करून त्रास देत आहे. यासंदर्भात २९ एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा येथे तिरंगा रेल रोको आंदोलन तसेच खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांच्या घरावर छत्रपती तलवार मोर्चा संविधान आर्मी व विविध १० संघटनेतर्फे काढण्यात येणार असल्याचे संधिवान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी सांगितले.